जालन्यातील लाठीचार्जवरुन शरद पवार Vs देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या काय मागणी?

जालन्यातील लाठीचार्जवरुन शरद पवार Vs देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या काय मागणी?

| Updated on: Sep 03, 2023 | 12:06 AM

tv9 Special Report | जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने, पवारांकडून अप्रत्यक्ष राजीनाम्याची मागणी ! बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर शरद पवार यांनी गोवारी प्रकरणाचा दाखला देत असे म्हणाले “गोवारी प्रकरणात आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आताच्या घटनेच्या वेळी जे गृहमंत्री आहेत त्यांनी जबाबदारी ओळखावी”, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी केली. जालन्यातील या घटनेनंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे आमने-सामने आलेत. तर शरद पवार यांनी ही मागणी केल्यानंतर फडणवीस यांनी भाष्य केले. जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर जेष्ठ नेत्यांनी गंगेत हात धूवू नये, असं नाव न घेता पलटवार केला होता. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बघा काय म्हणाले…

Published on: Sep 03, 2023 12:06 AM