ट्रिपल इंजिनचं सरकार पूर्णपणे स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, काय आहे रुग्णालयाचं वास्तव?
VIDEO | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलाय. ट्रिपल इंजिनचं सरकार संख्याबळामुळं पूर्णपणे स्वस्थ आहे. पण रुग्णालयं अस्वस्थ आहेत, असा आरोपही केला जातोय. तर रुग्ण दगावल्यावर मंत्र्यांना दाखवण्यासाठी औषधांचा साठा?
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांत 41 मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्यात नवजात बालकांची संख्या मोठी आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार संख्याबळामुळं पूर्णपणे स्वस्थ आहे. पण रुग्णालयं अस्वस्थ आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 2 दिवसांत 31 मृत्यू झालेत ज्यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही 24 तासांत 10 मृत्यू झालेत. म्हणजेच, महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थाच अस्वस्थ झालीय. धक्कादायक म्हणजे, औषधांचा पुरवठा न झाल्यानं आणि वेळेवर रुग्णांना औषधं न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांना हा आरोप मान्य नाही. नांदेडच्या रुग्णालयाचं हेच वास्तव आहे. नांदेडच्या रुग्णालयात आता मंत्र्यांचे दौरे वगैरे सुरु होणार म्हणून ऐनवेळी रुग्णवाहिकेतून अशा प्रकारे औषधांचा साठा सुरु झालाय. रुग्ण दगावल्यावर मंत्र्यांना दाखवण्यासाठी हा साठा आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. बघा स्पेशल रिपोर्ट

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
