पूजेला 7 मिनिटांचा उशीर अन् पुजाऱ्यांना थेट कारणे दाखवा नोटीस; पाहा नेमका वाद काय?
Tuljabhavani Mandir : तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात 2 पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. आता दोन पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नेमका वाद काय आहे? पाहा...
तुळजापूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात 2 पुजाऱ्यांमध्ये वाद झाला.या वादामुळे अभिषेक पूजेला 7 मिनिटांचा उशीर झाला.याप्रकरणी मंदीर संस्थानने 2 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मंदीर प्रवेश बंदीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. देवीच्या रोज सकाळी आणि सायंकाळी अभिषेक पूजा असतात. देवीच्या गाभाऱ्यात या निमित्ताने भोपे आणि पाळीकर या पुजऱ्यांच्या दोन गटातील वाद समोर आला आहे. या वादामुळे अभिषेक पुजा वेळेत सुरू झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून आता दोन पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Published on: Mar 14, 2023 07:32 AM
Latest Videos
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?

