AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड

राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड

| Updated on: Aug 20, 2026 | 10:16 PM
Share

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता सुटं खाद्यतेल विकण्यावर बंदी घालण्यात आली असून तेलाची विक्री केवळ सीलबंद आणि पूर्ण लेबल असलेल्या पॅकेजिंगमधूनच करता येणार आहे. भेसळयुक्त किंवा असुरक्षित तेलाची विक्री केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून काही प्रकरणांत सात वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा होऊ […]

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता सुटं खाद्यतेल विकण्यावर बंदी घालण्यात आली असून तेलाची विक्री केवळ सीलबंद आणि पूर्ण लेबल असलेल्या पॅकेजिंगमधूनच करता येणार आहे.

भेसळयुक्त किंवा असुरक्षित तेलाची विक्री केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून काही प्रकरणांत सात वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. अमानक तेलासाठी 5 लाख, मिथ्याछापित तेलासाठी 3 लाख आणि परवान्याशिवाय विक्री केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुकानदारांनी विनासील किंवा संशयास्पद खाद्यतेलाची खेप स्वीकारू नये, असा इशाराही FDA कडून देण्यात आला आहे.

Published on: Aug 20, 2026 10:16 PM

Follow Us