‘Tv9 मराठी’च्या बातमीचा इम्पॅक्ट ! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शुद्ध पाण्याची व्यवस्था
VIDEO | 'Tv9 मराठी'च्या बातमीचा इम्पॅक्ट, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शुद्ध पाणी उपलब्ध
बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखविली होती. तर जिल्हाधिकारी कार्यालायातील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी शुद्ध पाण्याच्या कॅनची व्यवस्था करण्यात आली होती. तर नागरिकांसाठी साधं पणी सुद्धा उपलब्ध नव्हते, असा भोंगळ कारभार टीव्ही 9 ने बातमीच्या माध्यमातून उघड करण्यात आला होता. बातमी दाखवताच प्रशासनाने नागरिकांसाठी ठिकठिकाणी शुद्ध पाण्याच्या कॅन ठेवल्या आहेत. त्यामुळं नागरिकांना आता भर उन्हात थंड आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत आहे. त्यामुळे त्यांनी टीव्ही 9 मराठीचे आभार मानले आहेत. मात्र प्रसाधनगृहाची सुद्धा व्यवस्था करावी, अशी अपेक्षा सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Published on: Jun 12, 2023 12:42 PM
Latest Videos