Special Report | …यामुळंच एक्स्प्रेस वेवर अपघात होतात!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं निधन झालं. आणि त्यानंतर महामार्गावरच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.
मुंबई : महामार्गावर लावलेल्या सूचना, लेनची शिस्त आणि स्पीड लिमिटचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सर्रास उल्लंघन होतं. रात्रीच्या वेळेला तर यातला एकही नियम पाळला जात नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं निधन झालं. आणि त्यानंतर महामार्गावरच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मेटेंच्या गाडीची महामार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकला पाठीमागून धडक बसली आणि गाडीचा चक्काचूर झाला. महामार्गावरची पहिली लेन ही हलक्या वाहनांसाठी असते. याच लेनमधून पुढच्या गाडीला ओव्हरटेक करण्याची मुभा असते आणि तिही फक्त हलक्या वाहनांना. या लेनमधून अवजड वाहन ना जाऊ शकतं. ना ओव्हरटेक करु शकतं. महामार्गावरची दुसरी लेनही हलक्या वाहनांसाठीच आहे. अवजड वाहनांना फक्त तिसऱ्या लेनमधूनच जाण्याची परवानगी आहे.
Published on: Aug 16, 2022 01:30 AM
Latest Videos