“पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष 31 वर्षाच्या तरुणावर…”, अमित ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजप-मनसेत ट्विटर युद्ध!
मनसेनचे युवा नेते अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला, म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता टोल नाका तोडफोडीवरुन मनसे आणि भाजपामध्ये ट्विटर युद्ध रंगलं आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्ग टोल नाका तोडफोडीवरुन मनसे आणि भाजपामध्ये ट्विटर युद्ध रंगलं आहे. भाजपाने खास व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मनसेच्या या कृतीला भाजपाने प्रत्युत्तर दिलं. “दादागिरी सहन करणार नाही. टोल नाक्यावर फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिट थांबवण्यात आली होती. अमित ठाकरे खोट बोलतायत,” असा भाजपाचा आरोप आहे. याला मनसेकडूनही उत्तर देण्यात आलं. “पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय,” असं ट्विट मनसेच्या वतीने करण्यात आलं आहे.
Published on: Jul 25, 2023 02:50 PM
Latest Videos

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
