बुलढाण्यात भीषण अपघात, दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक बसचा चुरडा अन् जागीच...

बुलढाण्यात भीषण अपघात, दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक बसचा चुरडा अन् जागीच…

| Updated on: Jul 29, 2023 | 11:00 AM

VIDEO | नागपूर मुंबई हायवे क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात

बुलढाणा, 29 जुलै 2023 | तीर्थयात्रा करून एक ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने येत असताना तीर्थयात्रींवर काळानं घाला घातल्याचे समोर आले आहे. मलकापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई हायवे क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. लक्ष्मीनगर उड्डान पुलावर घटना सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बसच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 21 प्रवासी जखमी झाले. तीर्थयात्रा करून एक ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर दुसरी ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने चालली होती. या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. यावेळी पहाटे 3 वाजता मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर दोन्ही बस समोरासमोर धडकल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.

Published on: Jul 29, 2023 10:57 AM