पण उद्धव ठाकरे यांच्याकडून 'ही' अपेक्षा नव्हती, उदय सामंत यांनी व्यक्त केली नाराजी

पण उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती, उदय सामंत यांनी व्यक्त केली नाराजी

| Updated on: Apr 04, 2023 | 9:40 PM

VIDEO | उदय सांमत यांनी महाराष्ट्रातील राजकरणावर बोलताना केल 'हे' भाष्य, बघा काय केली राजकीय नेत्यांना हात जोडून विनंती

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती, सकाळच्या साडेनऊच्या बातमीपत्राकडून अशी भाषा समजू शकतो, असे शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं योग्य नाही. तर तोलून मापून बोला, असे म्हणत उदय सामंत यांनी सर्व राजकीय नेत्यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री होण्याचा अधिकार ज्यानं तोंडात सोन्याचा चमचा ठेवलाय अशातला भाग नाही. त्यामुळे कुणीही कुठल्याही भाषेत टीका करायची हे योग्य नाही, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून तरी अशा भाषेची अपेक्षा नसून अशी भाषा लोकशाहीला धरून नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 04, 2023 09:40 PM