आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ फोटोवरून केलेल्या टीकेवरून उदय सामंत यांनी फटकारलं, म्हणाले…
जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावरच आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला होता. यावर उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
रत्नागिरी, १० डिसेंबर २०२३ : जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावरच आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला होता. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.आदित्य ठाकरे यांना काय वाटते यापेक्षा मुंबईच्या लोकांना काय वाटते याच्याशी आम्ही बांधील आहोत, असे म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तर मुंबईकरांच्या इतिहासात मुंबईची स्वच्छता करण्यासाठी कुठलाही मुख्यमंत्री स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावर उतरला नव्हता ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. आजपर्यंत कुठलाच मुख्यमंत्री नाल्यात उतरून सफाई कशी झाली हे बघत नव्हता, असे म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर थेट प्रतिक्रिया दिली.

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे

मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
