…तर चोरबाजार मांडावा लागला नसता, ‘त्या’ अटीवरून उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना खोचक टोला
गेल्या कार्यकाळात तुम्ही फुल्ल होता, त्यानंतर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते, एवढी घरफोडी केली असं वाटलं तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल पण देवेंद्र फडणवीस हे पाव उपमुख्यमंत्री झालेत, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई, १ फेब्रुवारी, २०२४ : अडीच वर्षांची अट मान्य केली असती तर चोरबाजार मांडावा लागला नसता, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर गेल्या कार्यकाळात तुम्ही फुल्ल होता, त्यानंतर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते, एवढी घरफोडी केली असं वाटलं तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल पण देवेंद्र फडणवीस हे पाव उपमुख्यमंत्री झालेत, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. दिमाखदारपणे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिला असतात ना कशाला चोरी केली तुम्ही…असा सवालही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. तर माझं पक्ष चोरण्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली.