Sudhir Salvi : शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी; ठाकरेंनी सांगितलं नियुक्तीचं कारण
Shivsena UBT News : शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही नियुक्ती करण्याच कारण सांगितलं आहे.
आपलं लक्ष्य बीएमसी आहे. त्यासाठीच सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. सुधीर साळवी यांची सचिव पदावर नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष्य आता बीएमसी असल्याचं विधान केलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तयारी केली जात आहे. त्याच अनुषंगाने पक्षाच्या काही पद नियुक्त्या ठाकरेंनी केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सुधीर साळवी यांना शिवसेना उबठा गटाचं सचिव पद देण्यात आलेलं आहे.
Published on: Apr 13, 2025 03:11 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

