तुम्ही कसले अध्यक्ष… उद्धव ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत काढली एकनाथ शिंदे यांची लायकी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. . विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल कसा चुकीचा दिला, याबाबत असीम सरोदे यांनी विश्लेषण केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील भूमिका मांडली आणि यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत थेट एकनाथ शिंदे यांना आव्हानच दिलं.
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला… नाही लवादाने. लबाडाने नाही लवादाने दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलो. देशात मतदार सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव किंवा कमी देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केलं आहे. सरकार कुणाचंही असलं तर जनता सर्वोच्च असली पाहिजे. हा सूर्य हा जयद्रथ. आता तरी निकाल मिळावा. न्याय मिळाला पाहिजे. पुरावा पुरावा की गाडावा. माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं तर तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का. गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार.म्हणजे राजकारणात. एकूणच जी काही थट्टा सुरू असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.