Uddhav Thackeray : ‘कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर…’, विधानसभेच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आज भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला. तो जर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. तरी देखील 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहे
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदे यांनी हाती शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली. यावेळी शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी आणि उपस्थितांशी संवाद साधला. तर उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आज भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला. तो जर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. तरी देखील 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहे आणि हा जो काही वसई-विरारला नोटांचा बॉम्ब फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे. कालच्या बॉम्बने फक्त देश नाही तर जग हादरला आहे. हा इतका मोठा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. तर या घोटाळाबाजांचे काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अदानी प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.