धनुष्यबाण चोरलं तरी प्रभू राम…, रामनवमीच्या दिवशी उद्धव ठाकरे काय म्हणाले?
VIDEO | 21 मार्चपासून नागपूरच्या रामटेक येथून सुरू झालेली महाभारत यात्रा आज मातोश्रीवर दाखल
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून 21 मार्चपासून महाभारत यात्रा सुरू केली होती. आज अखेर ही यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.उद्धव ठाकरे म्हणाले एका दृष्टीनं जर पाहिलं तर असं कोणीतरी कोणासाठी एवढे किलोमीटर पायपीट करत येणं हे सध्याच्या काळात अशक्य आहे. पण तुम्हाला मातोश्रीवर यावं वाटणं आणि माझ्यासोबत उभं राहावं असं वाटणं मी हा एक रामाचा आशीर्वाद मानतो, माझं धनुष्यबाण चोरून नेलं असलं तरी श्रीरामांचा आशीर्वाद अजूनही माझ्यासोबत आहे. आपल्याकडे जरी धनुष्यबाण नसला तरी आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धनुष्यबाण चोरून नेल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.