“देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”
VIDEO | ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणवरून राजकारण तापलं असताना कोणी केली देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका
ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्यानंतर ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे हे आक्रमक होत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या घडलेल्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. एवढ्या मारहाणीनंतरही साधा एफआयआर दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांनी ही लाचारी का पत्करली आहे? ठाणे पोलीस आयुक्तांनाही याप्रकरणी निलंबित करा अन्यथा त्यांची बदली करा, असा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यात सोमवारी संध्याकाळी मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रशमी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काल नेमकं काय घडलं, हे जाणून घेतलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलीस आयुक्तांना देखील खडसावले.