'मी कमळाबाईची...', शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, ठाकरे गटाने शिंदे गटाला पुन्हा डिवचलं

‘मी कमळाबाईची…’, शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, ठाकरे गटाने शिंदे गटाला पुन्हा डिवचलं

| Updated on: Sep 09, 2023 | 2:26 PM

VIDEO | ठाकरे गट आणि शिंदे गटात बॅनरवॉर, बांद्र्यातील 'त्या' बॅनरबाजीला ठाकरे गटाकडून दादर येथील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करत प्रत्युत्तर, ठाकरे गटानं लावलेल्या बॅनरमुळे शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | दादर येथील शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ही बॅनरबाजी करून ठाकरे गटाकडून शिंदे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’, अशा आशयाचे बॅनर दादरमधील शिवसेना कार्यकर्ते यांच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. दादर परिसरातील अशा बॅनरमुळे शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर बांद्रा येथे शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे बॅनर लागल्याने आम्ही त्यांना उत्तर म्हणून हे बॅनर लावले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. तर आम्हला डिवचण्याचा प्रकार करू नये अशा शब्दात इशारा देखील उद्धव ठाकरे गटाने दिला आहे.

Published on: Sep 09, 2023 02:26 PM