अजित पवार यांच्यावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली; म्हणाले, ‘धरणात …’
VIDEO | संजय राऊत यांच्या 'त्या' कृतीवर विरोधकांसह अजितदादांचाही आक्षेप, अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना संजय राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता सर्वस्तरातून टीका होत आहे. यावरून राऊतांनी सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे. त्याचं पालन सगळ्या नेत्यांनी करायला पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येकानं तारतम्य ठेऊन वागावं असा सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला आहे. यावरूनच संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांच्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले नेमकं संजय राऊत…