Sanjay Raut : शरद पवार यांचा बाप… बापाच्या पाठीत खंजीर खुपसला; संजय राऊत यांच्या निशाण्यावर कोण?
'दाऊदचे हस्तक भाजपने संसदेत घेतले. ते दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. अजित पवार यांनी स्वत:चं अवमूल्यन करून घेतलंय.', असं म्हणच संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
‘आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून हा माणूस पळाला. शरद पवार त्यांचा बाप आहे. शरद पवार हे त्यांच्या वडिलासमान होते. त्यांच्या पाठित खंजीर खुपसून पळाले. त्यांनी आम्हाला निष्ठा सांगू नये’, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली. पुढे राऊत असेही म्हणाले, प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधासह भाजपात गेले. राष्ट्रवादाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शाह यांनी त्यांना धुवून घेतलं. कारण ती वॉशिंग मशीन आहे. पटेल संसदेत आहे आम्हाला लाज वाटते. तर कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते है, हे भंडाऱ्यात कोण बोललं. कुठला मिर्ची? कुणाविषयी बोलले. ईडीची केस पाहा. नंतर भाजपमध्ये जाऊन बुट चाटून त्यांची चाटूगिरी करून आरोप धुण्याचा प्रयत्न केला. दाऊदशी व्यवहार, इक्बाल मिर्चीशी व्यवहार. मुंबईत १०० हून अधिक बॉम्बस्फोट केले अशा माणसाशी व्यवहार आता ते म्हणतील मला भाजपने क्लिनचीट दिली, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका राऊतांनी केली.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
