नागपूर बदलतयं, सुडाचे इमले उध्वस्त होतील; भाजपवर संजय राऊत यांचा प्रहार
संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना ट्विट केलं आहे. त्यांनी यामध्ये नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल असे म्हणत गडकरी यांचे कौतुक केलं आहे.
मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार करत टीका केली आहे. त्याचबरोबर राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक देखील केलं आहे. यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना ट्विट केलं आहे. त्यांनी यामध्ये नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल असे म्हणत गडकरी यांचे कौतुक केलं आहे. तर 2024 ला नागपूरचे चित्रं पूर्ण बदललेले दिसेल. त्या बदलाचे श्रेय जनतेला द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. तर नागपूर इतके दुष्ट कधीच नव्हतं. सुडाचे इमले उध्वस्त होतील. महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार मोर्चे काढत आहेत अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Published on: Apr 15, 2023 09:21 AM
Latest Videos