चंद्रकांत पाटीलांच्या शिंदे-ठाकरे मिलाप वक्तव्यावर केसरकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
त्यांनी माझ्या समोर दिलेलं वचन मोडला. वरिष्ठ पातळीवरून तसं झालं, मोदींनी त्यांना माफ केलं तर. पण ठाकरे यांनी मोदींचा अपमान केलेला आहे. त्याच्यावर आता हे जुळवून घेणे त्यांच्या हातात आहे
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल, असं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे बघा, मोठ्या लोकांमध्ये जास्त बोलायचं नसतं. जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांनी घेतला पाहिजे, असं म्हटलं आहे. तर स्वतः मोदींनी सांगितल्यानंतरही ठाकरे आले नाहीत. त्यांनी माझ्या समोर दिलेलं वचन मोडला. आता चांगला कारभार शिंदे महाराष्ट्राला देत आहेत. तर शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा ठाकरे यांची होती. मनात असलेलेच मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना फारसा वाईट वाटून व्हायचं कारण नाही.