मात्र याच उत्तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल; फडणवीस यांचा ठाकरेंना टोला

मात्र याच उत्तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल; फडणवीस यांचा ठाकरेंना टोला

| Updated on: Mar 26, 2023 | 1:29 PM

ठाकरेंच्या मालेगाव मधील सभेच्या ऊर्दु बॅनर वरून देवेंद्र फडणवीस यांनी हा जोरदार निशाणा साधताना, अली जनाब हे उद्धव ठाकरे शोभतं का? त्यांना ते भुषणावह वाटतं का? हे त्यांनाच विचारा असं म्हटलं आहे

मुंबई : उद्धव ठाकरे यांची मालेगावामध्ये सभा होत आहे. त्याआधी त्यांचे ऊर्दु भाषेतील पोस्टर लागल्याने राजकीय टीका होताना दिसत आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अली जनाब म्हणत आधी टीका केली होती. यानंतर त्यांच्या त्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं होत. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी ऊर्दु भाषेतील पोस्टरवरून ठाकरे यांना छेडत अली जनाब म्हटलं आहे.

ठाकरेंच्या मालेगाव मधील सभेच्या ऊर्दु बॅनर वरून देवेंद्र फडणवीस यांनी हा जोरदार निशाणा साधताना, अली जनाब हे उद्धव ठाकरे शोभतं का? त्यांना ते भुषणावह वाटतं का? हे त्यांनाच विचारा. पण त्यांना योग्य वाटतं असेल तर त्याला काही हरकत नाही. शेवटी ऊर्दु ही भाषा आहे. आमची हरकत नाही. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही आहोत लांगुल चालनाच्या विरोधात. आता जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ते लांगुन चालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल.

Published on: Mar 26, 2023 01:29 PM