‘शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी’, ठाकरे गटाच्या नेत्यानं केला हल्लाबोल
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशा मनोवृत्तीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची मागणी
मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | ‘आजचं शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशा मनोवृत्तीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे. धनगर, मराठा समाजाला खरा न्याय द्ययाचा असेल तर विशेष अधिवेशनात हे विधेयक आणलं गेलं पाहिजे. सध्याचं सरकार हे मराठा समाजाची अवहेलना करतंय. याचा निषेध उद्धव ठाकरे यांनी केलाय’, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय. तर 18 जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचा जीवन मुश्किल झालंय. दुष्काळ भागात उद्धव ठाकरे दौरा करणार आहे. 8 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात दौरा करणार आहेत. हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आम्ही आधीच केली असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.