औरंग्याची वृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

“औरंग्याची वृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची”; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 07, 2023 | 7:29 AM

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात काल संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात काल संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “औरंगजेब, अरे कोण औरंग्या? कोणाचे आहे. तुमच डबल इंजिन बसलं तर शोधा औरंग्याची औलाद. एवढही तुम्हाला माहित नाही. औरंग्याची औलाद महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. मी मुख्यमंत्री असताना का दंगल घडली नाही. तेव्हा औरंग्याची औलाद पळून गेली होती. अमित शाह गृहमंत्री आहेत त्यांना विचारा. आजसु्द्धा औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे.राज्यातील भगवी ताकद फोडण्याचं काम औरंग्याच्या वृत्तीने केली आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेला आहे. आमच्यामध्ये नाही. औरंगजेबाच्या घराणेशाहीचा इतिहास असेल, तर हा भाजपच्या घराणेशाहीचा इतिहास आहे.”

Published on: Aug 07, 2023 07:29 AM