Udhav Thackeray : जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
Udhav Thackeray News : तुम्ही हिंदुत्व सोडलंय का ते सांगा? असा प्रश्न उपस्थित करत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता. कारण आम्ही अशा भूमिका घेत आलो आहोत. गरीब मुस्लिमांचं यात काय हित होणार आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलंय का ते सांगा? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर वक्फ बोर्ड विधेयक आणि काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. काँग्रसेचा दबाव नाही. भाजपचा दबाव नाही. जे वाटतं पटतं ते करतो. मी अंधभक्त नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचे पावलं ज्या पद्धतीने पडत आहे. तुम्हाला वक्फमध्ये सुधारणा करायच्या त्या करा. पण आमच्या मंदिरांवरही उद्या याल. तुम्ही हिंदूंचे राखणदार नाही का. आम्हाला पटलं नाही ते आम्ही मांडलं होतं. नोटबंदीवर आम्ही बोललो होतो. मोदींचं सरकार आल्यावर लोकलची दरवाढ केली. त्याला आम्ही विरोध केला होता. आमचा ढोंग आणि नौटंकीला विरोध केला आहे. बिलमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. आमच्या सूचना घेतल्या असत्या तर चांगलं झालं असतं. सबका साथ आहे ना. मग सर्वांना सोबत का घेतलं नाही. आता महापालिकेच्या निवडणुका एवढ्यात होतील असं वाटत नाही. यावेळी भाजपने मुस्लिमांची बाजू घेतली आहे. जिनांना लाजवेल अशी भाषणे केली आहे. त्यामुळे हिंदूंनी आता जागं व्हावं. राम नवमी, होळी आणि हनुमान जयंतीला काही वाटलं का. होळीला पुरणपोळी वाटली का. यांना फक्त गरजेपुरते लोक हवे असतात. आमची भूमिका स्वच्छ आहे. या बिलाला हिंदुत्वाशी संबंध नाही. अमित शाह, किरन रिजिजू यांनी मुसलमानांचं लांगूलचालन केलं आहे. त्यामुळे हिंदूंचे डोळे उघडले आहे. हे आपला वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. हिंदू जागा झाला आहे. त्यामुळे उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार आहे, असंही ठाकरेंनी म्हंटलं.

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी

पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
