ठाकरेंच्या भेटीनंतर अर्ध्या तासातच दिघे गेले, आता रोशनी शिंदेंबरोबर तेच व्हायला नको; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप
रोशनी शिंदे यांना ज्या रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. तेथे सिव्हील सर्जनची टीम पाठवून त्यांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे
मुंबई : ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहान केली. त्यानंतर त्यांना दुखापत झाल्यानंतर रूग्णालयात हलविण्यात आले होते. पुन्हा त्यांना ठाकरे यांच्या भेटीनंतर एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. यावरून शिंदे गटातील नेत्यांनी रोशनी शिंदे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. ही मागणी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना, राजकारणासाठी रोशनी शिंदे हीचा नाहक बळी जाऊ नये असे म्हटलं आहे.
तर शिंदे यांना ज्या रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. तेथे सिव्हील सर्जनची टीम पाठवून त्यांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी शिंदे यांनी, त्यावेळी देखील दिवंगत आनंद दिघे हे रूग्णालयात असताना उद्धव ठाकरे हे भेटायला आले आणि अर्धा तासात त्यांचे निधन झाले. असेच या रोशनी शिंदे बरोबर होऊ नये, तिचा राजकारणासाठी नाहक बळी जाऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत असे म्हटलं आहे.