Thane : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आमदार आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत, भगवे झेंडे हातात धरून शिवसैनिकांनी काढली बाईक रॅली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात आज आमदार आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी जंगी तयारी केली असून भगवे झेंडे हातात धरून त्यांच्याकडून बाईक रॅली देखील काढण्यात आली.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करण्यात आली. त्यामुळे आज त्यांच्याच ठाण्यात आदित्य ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी ठाण्यात ठाकरे गटाकडून घोडबंदर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे हे नवी मुंबईत दाखल होणार असून त्याठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे.