सोलापुरातून ‘मोदी गॅरंटी’चा नारा तर मुंबईतून उद्धव ठाकरे यांची सडकून टीका; म्हणाले, बाळासाहेबांनी वाचवलं पण…
सोलापुरात मोदींनी आपल्या गॅरंटीवरून जनतेकडून आशीर्वाद मागितले आहे. तर यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असं पुन्नरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातून केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत अबकी बार चारसो पार असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई, २० जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी गॅरंटी हीच भाजपची नवी टॅगलाईन असल्याचे स्पष्ट झालंय. सोलापुरात मोदींनी आपल्या गॅरंटीवरून जनतेकडून आशीर्वाद मागितले आहे. तर यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असं पुन्नरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातून केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत अबकी बार चारसो पार असा विश्वास त्यांनी सभेतील भाषणात बोलताना व्यक्त केलाय. सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत उभारण्यात आली आहे. वस्त्रोद्योग, विडी कामगार यांच्यासाठी रे नगरमध्ये घरं देण्यासाठी घरं उभारण्यात आली. याचाच लोकार्पण सोहळा काल मोदींच्या हस्ते पार पडला, यावरूनच उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.