सध्या पत्रांचा जमाना, ‘त्यांच्या’वर कारवाई होणार का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना थेट सवाल
नबाव मलिक यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सध्या पत्रांचा जमाना आहे, असे म्हणत असताना राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की…
नागपूर, ११ डिसेंबर २०२३ : नबाव मलिक यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सध्या पत्रांचा जमाना आहे, असे म्हणत असताना राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की… त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार? त्याची वाट बघतोय असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तर देशाबद्दल एवढ्या भावना तीव्र असतील तर त्याचा आदर करतो. भाजपच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आल्या असतील तर त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार? त्यांनी ज्याप्रकारे सांगितलं की, नवाब मलिकांना दूर ठेवा. मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दोन न्याय हे लोकांना पटेल का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
Published on: Dec 11, 2023 05:46 PM