कपिल सिब्बल यांच्या 'त्या' आवाहनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा, बघा काय म्हणाले?

कपिल सिब्बल यांच्या ‘त्या’ आवाहनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा, बघा काय म्हणाले?

| Updated on: Mar 04, 2023 | 7:42 PM

VIDEO | कपिल सिब्बल यांनी नेमकं कोणतं आवाहन केलं ज्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला, बघा व्हिडीओ

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कपिल सिब्बल यांचं एक व्यासपीठ उभारावं, याचं आवाहन स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. न्यायव्यवस्था आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कपिल सिब्बल यांनी एक आवाहन केलं होतं. याच आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी पांठिबा दिला असून ते म्हणाले, देशात लोकशाही जिवंत रहावी, अशी ज्यांची इच्छा असेल त्या सगळ्यांनी कपिल सिब्बल यांना समर्थन देणे आवश्यक आहे आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. तर राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शनिवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अंतर्गत देशात सुरू असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी नवीन व्यासपीठ जाहीर केले आणि मुख्यमंत्री आणि भाजपसोडून इतर पक्षांच्या नेत्यांसह सर्वांकडून सहकार्य मागितले.

Published on: Mar 04, 2023 07:42 PM