इर्शाळवाडी दुर्घटनेवरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘कसला अमृत महोत्सव साजरा करतोय?’
VIDEO | 'शिवसेना नाव पुन्हा आपल्यालाच मिळणार', उद्धव ठाकरे यांनी सामनासाठी दिलेल्या आवाज कुणाचा या मुलाखतीत नेमका काय केला पुर्नउच्चार? बघा व्हिडीओ
मुंबई : रायगड जिल्ह्यात झालेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ते दिल्लीला गेले. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर आवाज कुणाचा या सामनाच्या पॉडकास्ट मुलाखतीद्वारे जोरदार निशाणा साधला. एवढी मोठी दुर्घटना झाली असताना मुख्यमंत्री दिल्ली दरबारी मुजरा करायला गेले. कुणाला मुजरा मारताय? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, यावेळी त्यांनी असेही म्हटले की, ‘मी इर्शाळवाडीत गेले तेव्हा एक तरूण मला ओरडून प्रश्न विचारत होता, आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का? हा प्रश्न मनाला चटका लावणारा आहे. आपण कसली ७५ वर्ष साजरी करत आहोत.’ इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी गेल्याचे समजतंय. हे कुठलं राजकारण आहे? अजूनही तिथे शोधकार्य सुरू आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी ही मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले.