विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे भाजपमध्ये येणार? कुणी केला मोठा दावा?
'अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे आले. यासह अजित पवार यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन मोदींच्या कामाने प्रेरित होऊन खरी राष्ट्रवादी सोबत ठेवत मोदींसोबत आले तसे उद्धव ठाकरे देखीले येणार'
नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी, २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे आले. यासह अजित पवार यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन मोदींच्या कामाने प्रेरित होऊन खरी राष्ट्रवादी सोबत ठेवत मोदींसोबत आले. तर मला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकींपूर्वी जे अहंकारी आणि सत्तेत बसल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्णतः विसरले, ते उद्धव ठाकरे आता बैचन झाले आहेत. कधी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांची माफी मागतो आणि त्यांना समर्पित होतो. यापद्धतीने उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून मोदींना पाठिंबा देतील, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र सदनाला भेट दिल्यानंतर केला.