Udhav Thackeray : हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न
Udhav Thakceray On Kunal Kamra : कॉमेडीयन कुणाल कामरा याने केलेल्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर त्यावरून राजकारण होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून आपली प्रतिक्रिया देत शिंदेसेनेवर टीका केली आहे.
कुणाल कामरा याने व्यंगात्मक गाणं केलं आहे असं मला वाटत नाही. त्याने सत्यात्मक गाणं केलं आहे. जनभावना मांडल्या आहेत, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कॉमेडीयन कुणाल कामरा प्रकरणावरून आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य हे गद्दारांच्या आदर्शने चाललं आहे. त्याचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे. काल याच गद्दारांना कुणाल कामराच्या गाण्यातून त्यांच्या तथाकथित नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून त्यांनी तोडफोड केली. यांना शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही. हे भेकड लोक आहेत. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलेलं आहे, असं मला वाटत नाही. त्याने जनभावना व्यक्त केलेल्या आहेत. सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला नाही. त्यामुळे यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे हल्ला झाला? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

