महाराष्ट्रभूषण सोहळ्याला हजेरी, तर आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा, कसा असणार अमित शाह यांचा दौरा
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकीला हजर राहणार आहेत
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी सायंकाळी मुंबईत येत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच बरोबर ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. शाह यांचा दौरा निवडणूक रणनीती आणि सरकारच्या राजकीय निर्णयांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
Published on: Apr 15, 2023 09:38 AM
Latest Videos