निवडणूक आयोगाच्या निकालावर अमित शाह म्हणताय; आज उद्धव ठाकरे यांना कळलं असेल की…
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरुन अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, काय म्हणाले बघा
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. धनुष्यबाणाच्या निकालानंतर दूध का दूध और पाणी का पाणी झालं असे अमित शाह यांनी म्हटले आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर कालच सत्यमेव जयते याचा प्रत्यय आला आहे. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या असल्याचेही सांगितले. यासह त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका करताना म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर मतं मागतली आणि मिळवली, इतकेच नाही तर सत्तेसाठी विरोधकांचे तळवे टाचले, पण आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना कळलं असेल की सत्य काय असतं, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निशाणा साधला.