अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर, करवीर नगरीत बॅनरबाजी; कोण-कोण उपस्थित राहणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. शाहांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरभर बॅनरबाजी केली आहे. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. शाहांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरभर बॅनरबाजी केली आहे. अमित शाह आज दुपारनंतर कोल्हापुरात येणार आहेत. दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही फुलांनी सजवण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी अमित शाहासाठी विशेष स्टेज उभारण्यात आलं आहे. विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत ही उपस्थित असणार आहेत.
Latest Videos