शाह यांचा दावा थेट कलावती बांदूरकर यांनीच थोडून काढला; म्हणाल्या, ‘मला जे काही मिळाले ते काँग्रेस’

शाह यांचा दावा थेट कलावती बांदूरकर यांनीच थोडून काढला; म्हणाल्या, ‘मला जे काही मिळाले ते काँग्रेस’

| Updated on: Aug 10, 2023 | 3:31 PM

याचदरम्यान दुसऱ्या दिवशी संसदेत यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांचे नाव चर्चेत आलं. यावेळी शेतकरी विधवा महिलेला असलेल्या बांदूरकर यांना काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निशाना साधला होता.

यवतमाळ, 10 ऑगस्ट 2023 । केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर सध्या तिन दिवस झाले चर्चा सुरू आहे. याचदरम्यान दुसऱ्या दिवशी संसदेत यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांचे नाव चर्चेत आलं. यावेळी शेतकरी विधवा महिलेला असलेल्या बांदूरकर यांना काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निशाना साधला होता. शाह यांनी काँग्रेसने कलावतीचा उपयोग केवळ राजकीय वापरासाठी केला. कलावती यांना मदत घरकुल, वीज पाणी हे काँग्रेसच्या नाही तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हे खरचं आहे का याची सत्यता पाहण्यात आली. यावेळी अमित शाह यांचा तो दावाच थेट कलावतीबाई बांदुरकर यांनी धूडकावून लावत तो खोटा ठरवला आहे. यावेळी प्रत्यक्ष भेटीत बांदुरकर यांनी, भाजपने केलेली मदत आपण धुडकावून लावली होती. तर जे काही मिळाले ते काँग्रेसच्या काळात राहुल गांधी यांच्या भेटीनंतर असे त्या म्हणाल्या आहेत. तर मला भाजपने किंवा मोदींनी कोणतीही मदत केली नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

Published on: Aug 10, 2023 03:31 PM