राणे यांचा शिंदे गटाला आधार, ठाकरे गटाला औकात काढण्याचा दिला इशारा; पाहा नेमकं काय झालं लोकसभेत?
यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा ही पाहायला मिळाला. यावेळी हिंदुत्वावरून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या भाषणाला अरविंद सावंत यांनी असं प्रत्युत्तर दिलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाच्या मदतीला धावले.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । काल लोकसभेत विरोधकांनी सत्ताधारी भाजप तथा एनडीएच्या सरकारवर विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर विरोधक आणि सत्ताधारी खासदारांत जोरदार चर्चा झाली. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा ही पाहायला मिळाला. यावेळी हिंदुत्वावरून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या भाषणाला अरविंद सावंत यांनी असं प्रत्युत्तर दिलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाच्या मदतीला धावले. तर ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांबद्दल बोलाल तर याद राखा असा दमच राणेंनी भरला. तर आपल्या भाषणात अरे बैठ, नीचे बैठ … तुम्हारी औकात निकालूंगा.. असे शब्द वापरले यावरून आता विरोधकांनी जोरदार अक्षेप घेतला आहे. तर यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आणि सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नेत्याला अशी भाषा शोभते का असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केलाय. तर लोकसभेत काय झालं विरोधकन आणि नारायण राणे यांच्यात पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये…