‘नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प…,’ काय म्हणाले नितीन गडकरी

एकीकडे आपल्या महाराष्ट्रात येणारा सेमी कंडक्टरचा प्रकल्प शेजारच्या गुजरात राज्यात गेल्याने आता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प आणू अशी आशा दाखविली आहे. नागपूरातील बुटी बोरी ( Butibori ) येथील जपानच्या होरीबा इंस्ट्रुमेंट कंपनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले  नितीन गडकरी
| Updated on: Jul 06, 2024 | 5:18 PM

नागपूरातील बुटी बोरी ( Butibori ) येथे जपानच्या होरीबा इंस्ट्रुमेंट कंपनीचा मेडिकल इक्वीमेंट प्रकल्प सुरु झाला आहे. त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. आता जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प देखील नागपूरात आणण्याचा आमचा विचार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात म्हटले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की विदर्भात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे येथील बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत वसविण्यात आली आहे. सेमी कंडक्टर आणि हायड्रोजन कार सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्री आहेत. फाईव्ह ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी करण्याचे पंतप्रधान यांचं स्वप्न आहे.भारताची अर्थव्यवस्था जगात तिसरी करण्याची योजना आहे.आपण जेव्हा या खात्याचा चार्ज घेतला तेव्हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज 7 लाख कोटींची होती आणि भारताचा नंबर जगात 7 वा होता. तीन महिन्यात आम्ही जपानाला मागे टाकत आमचा क्रमांक आता 3 आहे. याबद्दल जपानने वाईट वाटून घेऊ नये असेही त्यांनी यावेळी मिश्कीलपणे सांगितले. होरीबा इंडस्ट्रीजने विदर्भात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आणावा अशी माझी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा असल्याचे ते यावेळी म्हणाले. ऑटोमोबाईल आणि सेमी कंडक्टर जगात मोठे उद्योग आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्री अमेरिकेत 80 लाख कोटींची आहे, तर चायना 45 लाख कोटी, आपली भारताची 28 लाख कोटींची आहेत आमचा संकल्प आहे येत्या काही वर्षांत ती 50 लाख कोटींची करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविल. ही इंडस्ट्रीज चार कोटी जॉब तयार करते आणि केंद्र आणि राज्यांना सर्वाधिक जीएसटी देते असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

Follow us
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.