रामदास आठवले यांचा लोकसभा मतदार संघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली म्हणाले...

रामदास आठवले यांचा लोकसभा मतदार संघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली म्हणाले…

| Updated on: Aug 24, 2023 | 3:55 PM

VIDEO | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा शिर्डीतून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण शिर्डी आणि सोलापूर अशा दोन राखीव मतदार संघावर भाजपकडे आरपीआयने दावा केला आहे.

सोलापूर, २४ ऑगस्ट २०२३ | आपण शिर्डीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरमध्ये बोलत असताना म्हटले. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण शिर्डी आणि सोलापूर अशा दोन राखीव मतदार संघावर भाजपकडे आरपीआयने दावा केला आहे. शिर्डीमधील जनतेने आपणास संधी द्यावी. शिर्डीमध्ये निवडणूक लढवण्यास आपण उत्सुक आहोत. याबाबत आपण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बातचीत केली आहे. मात्र सध्या शिवसेनेचा विद्यमान खासदार त्याठिकाणी असल्यामुळे सर्व पक्ष एकत्रित बसून तोडगा निघेल. आणि योग्य निर्णय होईल. मात्र विदर्भ, मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र अशा भागातील प्रामुख्याने सोलापूर आणि शिर्डी अशा दोन मुख्य जागांवर आरपीआय निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.

Published on: Aug 24, 2023 03:54 PM