अज्ञातांनी फाडले भाजपच्या सभेचे बॅनर, कुठे घडली ही घटना?
मालवणच्या कांदळ गावात भाजपच्या सभेचे बॅनर अज्ञातांनी फाडले, आंगणेवाडीत आज जाहीर सभा
सिंधुदुर्ग : मालवणच्या कांदळ गावात भाजपच्या सभेचे बॅनर अज्ञातांनी फाडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नाईकांच्या मतदारसंघात भाजप-ठाकरे गटाता संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंगणेवाडीतील भराडी देवीच्या दर्शनाला येणार असून त्यानंतर आंगणेवाडीतच त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले आहे.
अंगणेवाडीच्या जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. रविंद्र चव्हाण यांनी कांदळमध्ये लावलेल्या या बॅनरवर सर्व भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो देखील होते. सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात फार पूर्वीपासून वाद आहे. अशातच कोण्या अज्ञात व्यक्तीकडून भाजपच्या जाहीर सभेचे बॅनर्स फाडण्यात आल्याने यासभेत नेमकं काय होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.