अवकाळीवर सामंत म्हणाले, शेतकरी, बळीराजानं असं हतबल न होता…
ठाणे, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका परिसरात सुशोभीकरणाची काम मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. ही कामं रस्त्यावरच सुरू आहेत
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये देखील पाऊस पडलाय. अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आजच पंचनामे करण्याच्या आदेश देतील. पण शेतकरी, बळीराजानं असं हतबल न होता, नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सजग राहील पाहिजे. आमचं सरकार पूर्णपणे त्यांच्यासोबत असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच सुशोभीकरणाच्या कामासह अवकाळी पावसाने वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यावर सामंत यांनी, ठाणे, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका परिसरात सुशोभीकरणाची काम मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. ही कामं रस्त्यावरच सुरू आहेत. त्याच्यामुळे वाहतुकीला त्रास होतोय किंवा पावसामुळे अडथळा येत आहे. त्यामुळे सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना ही कामे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार

