बळीराजा पुन्हा संकटात सापडणार? राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस अवकाळीचा इशारा
VIDEO | अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने फळबागायतदार पुन्हा एकदा चिंतेत, पुढील ५ दिवस कुठं दिला अवकाळीचा इशारा?
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने नागरिकांना हैराण करून सोडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील पुढील पाच दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता नागपूरसह विदर्भात वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने फळबागायतदार पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. दरम्यान सध्या नागपुरमध्ये ढगाळ वातावरण असून नागपूरचं तापमान ६ अंशाने कमी झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात देखील पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.