‘लालबाग राजा’च्या दर्शनाला उर्फी जावेद हिला VVIP ट्रीटमेंट, मुंबईच्या डब्बेवाल्यांची संतप्त मागणी काय?
VIDEO | मुंबईतील नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंच्या भाविकांची गर्दी, अशातच लालबागचा राजा मंडळाच्या VVIP ट्रीटमेंटवरून पुन्हा वाद, काय केली मुंबईच्या डब्बेवाल्यांची मागणी?
मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये बाप्पाची सजावट आणि बाप्पाचं लोभस रूप पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस असून मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते कलाकार, राजकीय नेते मंडळी या बाप्पाच्या दर्शनासाठी जात असतात. या लोकांसाठी लालबागचा राजा या मंडळाकडून व्हीव्हीआयपींच्या दर्शनासाठी वेगळी रांग करण्यात आली आहे. याच रांगेतून प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेदला प्रवेश दिल्याने आता मंडळावरच टीका होताना दिसत आहे. तर मुंबई डबेवाला असोसिएशनकडून यावरून प्रचंड संताप व्यक्त करणयात येत आहे. उर्फी जावेदला व्हीव्हीआयपी गेटमधून लालबागचा राजाच्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. तिच्या हस्ते लालबागचा राजाची आरतीही करण्यात आली. त्यामुळे डबेवाला असोसिएशन यावर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा मंडळाकडून भक्तांमध्येच भेदभाव का केला जात आहे? उर्फी सारख्या लोकांनाही व्हीव्हीआयपी रांगेतून थेट दर्शन मिळत असेल तर हे व्हीव्हीआयपी दर्शनच बंद करा, अशी मागणीही डबेवाल्यांनी केली आहे.