मुंबईतील पर्यटनस्थळी लसीकरण शिबीर
बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील पर्यटनस्थळी आता लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत.
सध्या कोरोना लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. लसीकरण वाढल्यामुळेच कोरोना नियंत्रणात आला. आता बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, मुंबईतील पर्यटनस्थळी आता लसीकरणाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत. या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Latest Videos