“इर्शाळवाडी येथे झालेली घटना अत्यंत वेदनादायक”, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनवर वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इर्शाळवाडी येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायक आणि चटका लावून जाणारी आहे.दहा जणांचा इथे मृत्यू झाला आहे तर बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. मदत कार्य त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे त्या सगळ्यांची चिंता आहे. या प्रकाराची वलनर्याबिलिटी पाहून ऑडिट होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, जिथे लोक राहतात त्या सगळ्यांचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचे आहे. ते होत नाहीये आणि हे सरकारचं सगळ्यात मोठा अपयश आहे. ”