मनसेचा 'हा' मोठा नेता म्हणतो, 'आमदार नाही, मला तर खासदार व्हायचंय...'

मनसेचा ‘हा’ मोठा नेता म्हणतो, ‘आमदार नाही, मला तर खासदार व्हायचंय…’

| Updated on: Sep 03, 2023 | 4:20 PM

मनसेच्या एका बड्या नेत्याने आगामी लोकसभा निवडणुक लढवून खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या नेत्याला आमदार व्हायचं नाही. तसं त्याने स्पष्ट केले. पुण्यातला हा बडा नेता नेमका काय म्हणाला पाहा...

पुणे, इंदापुर : 3 सप्टेंबर 2023 | मनसेचे पुण्यातील नेते नगरसेवक वसंत मोरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून नेमणूक केली. वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यात मोरे यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. इंदापूर तालुक्यात मोरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वसंत मोरे यांनी येथे मनसेच्या शाखांचे उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत वंसत मोरे यांना पुण्यातून आमदारकीची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न केला. त्यावर मोरे यांनी “मला यावर्षी खासदार व्हायचं आहे, पुण्याचा खासदार म्हणून मी इच्छुक आहे. माझ्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला संधी दिली तर यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार वसंत मोरे 100% असणार” असा आशावाद व्यक्त केला.

Published on: Sep 03, 2023 04:20 PM