तुमच्या ताटातली भाजी महागली! वाट्याण्यानं टोमॅटोला टाकलं मागं, कोणत्या भाज्यांचे दर किती?
VIDEO | मुंबईत पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ; भाज्याचे दर कडाडले, कोणती भाजी कितीला मिळणार बघा दर
मुंबई, 29 जुलै 2023 | सामान्य मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी…तुमच्या ताटातील भाजी महागली असून पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईला झोडपणाऱ्या पावसामुळे भाज्याचे दर कडाडले आहेत. हिरल्या वाटाण्याने तर टॉमेटोच्या दराला देखील मागे टाकले आहे. दरवाढ झालेल्या किमतीनुसार, वाटाणा २४० रूपये प्रतिकिलो तर टॉमेटो १८० रूपयांवर पोहोचला आहे. गवार १२० रूपये प्रतिकिलो, फरस बी १२० रूपये, काकडी ४० रूपये, दुधी ८० रूपये, वांगी ८० रूपये, कारलं ८० रूपये प्रतिकिलो दरावर पोहोचलं आहे. भाज्यांचे दर २०० टक्क्यांनी महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्या भाज्या जेवणात करायच्या असा प्रश्न सामान्य गृहिणींसमोर येऊन ठेपला आहे.
Published on: Jul 29, 2023 03:37 PM
Latest Videos