Kalyan Politics | कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरुन मनसे-शिवसेनेत कलगीतुरा, मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला मनसेच्या एकमेव आमदाराचं आव्हान
VIDEO | कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरुन मनसे आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आलेत. कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट आव्हान दिलंय. राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे
मुंबई, ७ ऑक्टोबर, २०२३ | कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरुन सध्या मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. काही दिवसांपूर्वी राजू पाटील यांना भावी खासदार लिहिलेला केक कापला. इतकंच नाही तर साहेबांनी आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राजू पाटलांच्या घोषणेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात आता वादाला तोंड फुटलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटलांच्या आव्हानाला उत्तर देताना आजीच्या पुढे माजी लागायला नको याची काळजी घ्या, असा टोला लगावला. त्यावर राजू पाटलांनीही ट्वीट करत श्रीकांत शिंदे यांना चांगलंच डिवचलंय. बापाने पॉकेट मनी म्हणून MMRDA, MSRDC चा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता? कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या, रेल्वेच्या प्रवाश्यांना रोज मरणयातना भोगाव्या लागल्या नसत्या. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट