ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचं निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

VIDEO | अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा माहाराज सातारकर यांची वयाच्या ८९ व्या वर्षी मालवली प्राणज्योत. महाराष्ट्रातील वारकरी किर्तनकार, प्रसिद्ध प्रवचनकार अशी बाबामहाराज सातारकर यांची ओळख होती.

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचं निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Oct 26, 2023 | 10:49 PM

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचं आज  निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील वारकरी किर्तनकार, प्रसिद्ध प्रवचनकार अशी बाबामहाराज सातारकर यांची ओळख होती. अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा माहाराज सातारकर यांची नवी मुंबईतील नेरूळ येथे आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीन वाजेनंतर नेरूळ जिमखान्याच्या समोर असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबामहाराज सातारकर यांचे खरे नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला असून १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्या घराण्यात आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.